फ्रायीड मसाला भेंडी |
साहित्य
- लहान आकाराच्या भेंडी - १/२ कि
- आमचूर पावडर - १ चमच
- लाल तिखट - १ चमच
- मीठ - १ चमच
- हळद - १/२ चमच
- धणे पूड - १ चमच
- गरम मसाला - १/२ चमच
कृती
- एक तासाआधी सर्व भेंडी धुऊन सुकवून ठेवाव्या
- भेंडी सुकल्या नंतर दोन्ही बाजूंचे देठ कापून घ्यावेत
- एका प्लेटमध्ये मसाले (आमचूर पावडर ,तिखट ,मीठ ,हळद ,धणे पूड ,गरम मसाला )घेऊन एकत्र करून मसाला तयार करून घ्यावा
- भेंडीला एका बाजूने उभा काप देऊन त्यात तयार मसाला भरून घ्यावा
- फ्रायिंग प्यान मधे तेल (३ मोठे चमच ) घेऊन त्यात भेंडी चांगल्या प्रकारे फ्राई करुन घ्यावी
अश्या प्रकारे मसाला भेंडी तयार ...................
No comments:
Post a Comment